adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या आणि शांततेचा भंग करणाऱ्या हुल्लडबाजांविरुद्ध तोफखाना पोलिसांनी धडक कारवाई

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या आणि शांततेचा भंग करणाऱ्या हुल्लडबाजांविरुद्ध तोफखाना पोलिसांनी धडक कारवाई  सचिन मोकळं अहिल्...

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या आणि शांततेचा भंग करणाऱ्या हुल्लडबाजांविरुद्ध तोफखाना पोलिसांनी धडक कारवाई 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर :- सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या आणि शांततेचा भंग करणाऱ्या हुल्लडबाजांविरुद्ध अहिल्यानगरच्या तोफखाना पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे.काल सायंकाळी झोपडी कॅन्टीन परिसरातील प्वाईन्स जवळ जाहीरपणे दारू पिऊन आरडाओरडा करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी रंगेहात पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,दि.२० मे २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सुजय विल्याम हिवाळे,पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर,सुमीत गवळी, भानुदास खेडकर आणि इतर पोलीस कर्मचारी परिसरात पायी पेट्रोलिंग करत होते.पेट्रोलिंग दरम्यान वाईन्स समोर काही इसम पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक ग्लासमध्ये मद्यप्राशन करत असताना आणि मोठ्या आवाजात आरडाओरडा करताना पोलिसांना दिसून आले. पोलीस जवळ येताच काही जणांनी अंधाराचा फायदा घेऊन तिथून पळ काढला,मात्र पोलिसांनी एकाला जागीच ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची विचारपूस केली असता,त्याने त्याचे नाव देवीदास दादासाहेब नाकाडे (वय ३५ वर्षे, रा.नागापूर,मोठा पुलाजवळ,ता. जि.अहिल्यानगर) असे असल्याचे सांगितले.तो प्रचंड नशेत असल्याने पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला जिल्हा शहर वाहतूक कार्यालय येथे नेले.तेथे 'ब्रीथ अ‍ॅनालायझर' (Breath Analyser) मशीनद्वारे त्याची तपासणी केली असता,त्याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले.सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी आणि बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी पोलीस अंमलदार सुजय हिवाळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी देवीदास नाकाडे याच्याविरुद्ध दारूबंदी कायदा कलम ८५ (१) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११२/११७ अन्वये तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोहेकॉ/मरभळ करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे धिंगाणा घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही,असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

No comments