डॉ.प्राजक्ता चौधरी हिस टेक्सास विद्यापीठातून ओरल अँड मॅक्सिलो फेशियल रेडिओलॉजी सर्टिफिकेट पदवी प्रधान इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेम...
डॉ.प्राजक्ता चौधरी हिस टेक्सास विद्यापीठातून ओरल अँड मॅक्सिलो फेशियल रेडिओलॉजी सर्टिफिकेट पदवी प्रधान
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
न्हावी येथील मूळ रहिवासी प्रमोद बळीराम चौधरी ह.मु. डोंबिवली ईस्ट) यांची थोरली कन्या डॉ . प्राजक्ता प्रमोद चौधरी हिने टेक्सास विद्यापीठातून ओरल अँड मॅक्सिलो फेशियल रेडिओलॉजी सर्टिफिकेट ही पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. यामध्ये दंतवैद्यक आणि रेडिओलॉजी ही एक विशेष शाखा असून यात तोंड, दात, जबडा, चेहरा आणि मान यांचे आजारांचे निदान करण्यासाठी एक्स-रे, सिटीस्कॅन, एम आर आय सारख्या प्रतिमांचा वापर करून रोगाचे निदान करण्यात येते. तिने मिळवलेल्या यशाबद्दल मनोहर करांडे,सौ. शुभांगी करांडे, हर्षल करांडे, निखिल नेमाडे, आरव नेमाडे, सौ.तानिया नेमाडे, मिलिंद झोपे, सौ.भारती झोपे, गोविंदा ढाके, प्रा.आर वाय पाटील, युवराज वाघुळदे, ललित कुमार फिरके, सौ. माधुरी ढाके,सौ. सुवर्णा पाटील, सौ.सुरेखा वाघुळदे, सौ.संगीता फिरके, डाॅ.भारती झोपे, सौ.चारुलता चौधरी , किशोर झोपे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

No comments