adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नूतन मराठा महाविद्यालयात इसरो स्टार्टअप प्रोग्रामची यशस्वी सुरुवात; विद्यार्थ्यांना ‘ए’ ग्रेडसह सर्टिफिकेट

 नूतन मराठा महाविद्यालयात इसरो स्टार्टअप प्रोग्रामची यशस्वी सुरुवात; विद्यार्थ्यांना ‘ए’ ग्रेडसह सर्टिफिकेट  जळगाव प्रतिनिधी:–  (संपादक -:- ...

 नूतन मराठा महाविद्यालयात इसरो स्टार्टअप प्रोग्रामची यशस्वी सुरुवात; विद्यार्थ्यांना ‘ए’ ग्रेडसह सर्टिफिकेट 


जळगाव प्रतिनिधी:– 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

नूतन मराठा महाविद्यालयात वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी इसरो (ISRO) स्टार्टअप ऑनलाईन प्रोग्रामची यशस्वी सुरुवात झाली असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीत मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाविद्यालयास इसरोकडून कोर्स कंडक्ट करण्यासाठी अधिकृत सेंटरचे सर्टिफिकेट प्राप्त झाले असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध झाली आहे. या अंतर्गत ‘Scientific Observation from Space’ या विषयावरील ISRO स्टार्ट प्रोग्रामची पहिली बॅच 11 मार्च 2026 ते एप्रिल 2026 या कालावधीत यशस्वीरीत्या पार पडली.

या प्रोग्राममध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 विद्यार्थ्यांनी ‘A’ ग्रेड मिळवत इसरो डेहराडून येथील सर्टिफिकेट प्राप्त केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

महाविद्यालयात भविष्यातही असे नवनवीन अभ्यासक्रम सुरू ठेवण्यात येणार असून पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यामध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील, डॉ. माधुरी पाटील तसेच सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. आर. बी. देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments