उन्हाच्या तीव्रतेत लहान मुलांसाठी चप्पल वाटप; रावेर येथे सामाजिक उपक्रमाचे कौतुक रावेर (प्रतिनिधी) – (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सध्या व...
उन्हाच्या तीव्रतेत लहान मुलांसाठी चप्पल वाटप; रावेर येथे सामाजिक उपक्रमाचे कौतुक
रावेर (प्रतिनिधी) –
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सध्या वाढत्या उन्हामुळे लहान मुलांना होणारा त्रास लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत चप्पल वाटपाचा स्तुत्य उपक्रम रावेर येथे राबविण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन मा. श्री. विनोद रामचंद्र कोळी (शिवा भाई G) – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्य कार्यकारणी सदस्य तथा उत्तर महाराष्ट्र संघटक व दैनिक लोकशाही प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आले. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक लहान मुले अनवाणी फिरताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना दिलासा मिळावा या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला.
या चप्पल वाटप उपक्रमासाठी चि. तुषार रामचंद्र कोळी (खान्देश ब्लॉगर) तसेच श्रद्धा सबुरी बुट हाऊस, एम. जे. मार्केट, बस स्टँड समोर, रावेर यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत असून सामाजिक जाणीव जपणारा व प्रेरणादायी उपक्रम असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी नितीन भवर, विजय सोनार, कौशल पाटील, धनराज कोळी, हर्षल कोळी आदी उपस्थित होते.

No comments