adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विश्व हिंदू परिषद, बजरंग दला चे यावल तहसील कार्यालय तसेच पोलिस स्टेशन येथे निवेदन

 विश्व हिंदू परिषद, बजरंग दला चे यावल तहसील कार्यालय तसेच पोलिस स्टेशन येथे निवेदन  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...

 विश्व हिंदू परिषद, बजरंग दला चे यावल तहसील कार्यालय तसेच पोलिस स्टेशन येथे निवेदन 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 राज्यातील गोवंश हत्या बंदी कायद्याच्या कडक अंमलबजावणीसाठी गृह विभागाने जारी केलेल्या नवीन शासनादेशाचे (शासन परिपत्रक क्रमांक-एमआयएस-०५२६/प्र.क्र. ५६/विशा-१ब) काटेकोर पालन व अवैध वाहतूक आणि कत्तल करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दला तर्फे यावल तहसील ऑफिस तसेच यावल पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले 

 महाराष्ट्र सरकारने स्वदेशी गायीला 'राज्यमाता' चा दर्जा दिला असून, संपूर्ण राज्यात गोवंश हत्या बंदी आणि त्यांच्या अवैध वाहतुकीला कायद्याने पूर्णपणे प्रतिबंध केला आहे.

परंतु, अत्यंत खेदाची बाब अशी आहे की, अजूनही काही समाजकंटक आणि तस्कर पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून छुप्या मार्गाने गोवंशाची अवैध वाहतूक आणि कत्तल करत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. या बेकायदेशीर कृत्यांमुळे राज्यातील प्राणी कल्याण कायदे (Animal Welfare Laws) तर पायदळी तुडवले जात आहेतच, शिवाय बहुसंख्य हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

शासनादेशानुसार राज्यातील सर्व पोलीस प्रशासनाला गोवंश संरक्षण कायद्याची अत्यंत कडक अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट व सक्त आदेश देण्यात आले आहेत.

 या विषयाचे गांभीर्य ओळखून योग्य ती उपाययोजना आणि कारवाई करावी अशी विनंती  बजरंग दल तालुका सह संयोजक हेमंत बडगुजर , सागर कोळी , योगेश पवार, ओम चोव्हाण, कमलेश शिर्के, गुणवंत मिस्त्री, राजेश काटकर, चंदन फेगडे सह सर्व कार्यकर्त्यांना द्वारे करण्यात आली......

No comments