adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नाफेडकडून खरेदी केलेल्या मका व हरभऱ्याचे पैसे रखडले; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तहसीलदार यांना आंदोलनाचा इशारा

 नाफेडकडून खरेदी केलेल्या मका व हरभऱ्याचे पैसे रखडले; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तहसीलदार यांना आंदोलनाचा इशारा  अमोल बावस्कार बुलढाणा (संपा...

 नाफेडकडून खरेदी केलेल्या मका व हरभऱ्याचे पैसे रखडले; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तहसीलदार यांना आंदोलनाचा इशारा 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर:-  नाफेड अंतर्गत शासनाने खरेदी केलेल्या मका व हरभरा या धान्याचे पैसे गेल्या पाच महिन्यांपासून शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांकडे बियाणे, खते व शेती मशागतीसाठी पैसे नसल्याने मोठी चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार समाधान सोनवणे साहेब यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, शासनाने हजारो क्विंटल मका व हरभरा खरेदी करून घेतला मात्र शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. जवळपास पाच महिने उलटूनही पैसे न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून शासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजप सरकारवर जोरदार टीका करत, “शेतकऱ्यांचा माल घेऊन त्याचे पैसे थकवणे म्हणजे शेतकऱ्यांची लूट करण्याचाच प्रकार आहे,” असा आरोप केला. तात्काळ सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात यावेत, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला.

या वेळी जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे, तालुकाध्यक्ष गोपाल सातव, सतीश पाटील, नांदुरा तालुका सोशल मीडिया प्रमुख योगेश लांजूळकर, शुभम टकले, दिलीप कायकुटे, अजय भगत यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.

No comments