adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर पोलिसांनी रोखली गुरांसह गोवंशाची वाहतूक पाच संशयीतांविरोधात गुन्हा दाखल

 फैजपूर पोलिसांनी रोखली गुरांसह गोवंशाची वाहतूक पाच संशयीतांविरोधात गुन्हा दाखल   काल्पनिक फाईल फोटो  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकां...

 फैजपूर पोलिसांनी रोखली गुरांसह गोवंशाची वाहतूक पाच संशयीतांविरोधात गुन्हा दाखल  

काल्पनिक फाईल फोटो 

इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल तालुक्यातील पिंपरोड फाट्यापासून आमोदा जाणाऱ्या रोडवर गोवंश व म्हशी घेऊन जाणारी दोन वाहने फैजपूर पोलिसांनी पकडली. एकूण आठ लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. न्हावी गावापासून फैजपुरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक संशयीत पायी पाच गोवंश नेत असताना पकडण्यात आला याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.

फैजपूर ते भुसावळ रस्त्यावर पिंपरुड फाट्याकडून आमदा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून बुलेरो पिकअप वाहन (क्रमांक एम.एच.19 सी. एक्स 2147) त्याचप्रमाणे दुसरे पुन्हा बोलेरो पिकअप वाहन (क्रमांक एम.एच. 19 सी एक्स. 0487) या दोघांमध्ये तब्बल 14 म्हशी आणि एक पारडूची अवैधरित्या वाहतूक केली जात होती. याची माहिती फैजपूर पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने दोन्ही वाहन आणि त्यातील प्राणी म्हशी असा एकूण आठ लाख 80 हजारांचा मुद्देमाल पकडला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात कुलदीप पवार यांच्या फिर्यादीवरून सलमान इसाक शेख, शेख मुस्तकीम शेख अब्दुल्ला (रा. अख्तर नगर  वरणगाव) शेख इरफान शेख बिस्मिल्ला(रा. बडा आखाडा, सावदा) व आवेश खान एजाज खान (रा. ख्वाजा नगर, सावदा) या चार जणांविरुद्ध प्राणी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक मोईनुद्दीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय झाल्टे करीत आहे. 

न्हावीजवळ गोवंश पकडले 

न्हावी ता. यावल या गावाकडून फैजपूर जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या अंधारात आमीन रुबाब तडवी (रा. तळेगांव, न्हावी) हा पाच गोवंश बैल पायी नेत होता. चोरट्या मार्गाने तो जनावरे नेत असल्याची माहिती वैजापूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी एक लाख पाच हजारांचे गोवंशाची सुटका केली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात देवेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला तपास हवालदार सुपडु पाटील करीत आहे.

No comments