प्लेज फाउंडेशन कडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप... समाजसेविका रुचिता ताई नाईक यांचा हस्ते वाटप..... अमोल बावस्कार मुंबई (संपादक -:- हेमकांत गा...
प्लेज फाउंडेशन कडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप...
समाजसेविका रुचिता ताई नाईक यांचा हस्ते वाटप.....
अमोल बावस्कार मुंबई
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नालासोपारा ता,१६ :- सामाजिक कार्यात अनमोल योगदान देणारी सामाजिक दायित्व जपणारी प्लेज फाउंडेशने समाजात एक वेगळ स्थान निर्माण केले आहे.
या फाउंडेशन चा माध्यमातून व समाजसेविका रुचिता नाईक यांचा हस्ते नालासोपारा मधील समेळ पाडा येथे १५ कुटुंबीयांना महिला भगिनींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
अशावेळी आपल्या स्तुत्य उमक्रमाने समाजसेवेचा ठसा समाजासमोर उमटविणारे , नेहमी तन, मन धनाने गरजु करिता आपले मोलाचे सहकार्य देनाऱ्या समाजसेविका रुचिता नाईक यांनी प्रमुख्याने मोलाचे योगदान दिले.
सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून प्लेज फाउंडेशन सामाजिक उपक्रम राबवत असते दिव्यांग बांधवांसाठी मोफत व्हील चेअर, वॉकर, जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थांन साठी शालेय वस्तू, खाऊ, युनिफॉर्म वृद्धाश्रम, आदिवासी पाड्यांवर जीवनावश्यक वस्तू,अन्नदान गरजू होतकरू नागरिकांना हावी ती मदत आदींसह अनेक उपक्रम प्लेज फाउंडेशनच्या माध्यमातून होत असतात.


No comments