adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बिअरबार फोडणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड..! तब्बल ५ गुन्हे उघड.. स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

 बिअरबार फोडणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड..! तब्बल ५ गुन्हे उघड.. स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेम...

 बिअरबार फोडणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड..! तब्बल ५ गुन्हे उघड..

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:- संगमनेर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिअरबार आणि हॉटेल्स लक्ष्य करून चोऱ्या करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.या कारवाईत पोलिसांनी तीन मुख्य आरोपींसह चोरीचा माल विकत घेणाऱ्या एका हॉटेल चालकाला अटक केली असून,त्यांच्याकडून तब्बल ५ लाख ५५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाईमुळे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील एकूण ५ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंदरमाळवाडी (ता. संगमनेर) येथील किशोर बाळाजी डोके यांच्या 'हॉटेल निलायम बार'वर अज्ञात चोरांनी डल्ला मारला होता.चोरट्यांनी हॉटेलच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि विविध कंपन्यांची ३ लाख ६ हजार १९० रुपयांची विदेशी दारू,सिगारेट आणि गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर (DVR) असा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२),३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले.या पथकात पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार,फुरकान शेख, बाळासाहेब गुंजाळ,योगेश कर्डिले,अमृत आढाव,महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत आणि चालक महादेव भांड यांचा समावेश होता.या पथकाने तात्काळ घटनास्थळाची पाहणी करून तपासाची चक्रे फिरवली.गुन्ह्याचा तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्याने तपास करत असताना,रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार हसन हमजा कुट्टी (रा.नाशिक) याने हा गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली.तो आपल्या साथीदारांसह नाशिकमधील वडाळा येथील म्हाडा बिल्डिंग परिसरात लपून बसल्याचे समजताच पोलिसांनी तिथे छापा टाकला.हसन हमजा कुट्टी (रा. नवनाथनगर,शेवाडी,पंचवटी, नाशिक),आकाश सचिन सुर्यवंशी (रा.दत्त चौक,कालिका माता मंदिराजवळ, सिडको, नाशिक),मेहताब गुलाम रसुल अन्सारी (मूळ रा.नुरीनगर, कटहार तांडा,जि.गिरटी, झारखंड) तसेच त्यांचा एक साथीदार बंटी दास (रा. झारखंड) हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

आरोपींची कसून चौकशी केली असता,त्यांनी चोरलेला माल पळसे (ता.जि.नाशिक) येथील 'हॉटेल लकी बार अँड रेस्टॉरंट'चे चालक किरण रामदास उगले व विवेक अरुण उगले यांना विकल्याची कबुली दिली.विवेक उगले याने चोरीसाठी वाहन उपलब्ध करून दिले होते. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चोरीचा माल विकत घेणारा आरोपी किरण रामदास उगले (रा. सामनेर, ता. इगतपुरी, सध्या रा. पळसे, नाशिक) यालाही अटक केली आहे.

No comments