adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी शब्बीर खान यांची निवड

 युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी शब्बीर खान यांची निवड   यावल (प्रतिनिधी): (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  यावल तालुक्याती...

 युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी शब्बीर खान यांची निवड  


यावल (प्रतिनिधी):

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 यावल तालुक्यातील हिंगोणा येथील रहिवासी शब्बीर खान सरवर खान यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश सर यांनी त्यांच्या पत्रकारितेतील कार्याची दखल घेत ही निवड जाहीर केली.

शब्बीर खान हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकार क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी दैनिक सकाळ, दैनिक गावकरी, दैनिक आव्हान, दैनिक साईमत यांसारख्या विविध वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे. सध्या ते दैनिक भास्करमध्ये यावल तालुका प्रतिनिधी म्हणून गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत आहेत.

त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामध्ये नितीन सोनार (जिल्हा उपसंघटन प्रमुख, शिवसेना शिंदे गट), अनिल पाटील, चेतन अढळकर, देवकांत पाटील, तसेच पत्रकार अरुण पाटील, डी.बी. पाटील, शेखर पटेल, सुनिल गावडे, तेजेश यावलकर, भरत कोळी, महेश पाटील, प्रकाश चौधरी, बशीर तडवी, शकील शेख (रावेर), अशोक तायडे (डोंगर कठोरा), मुबारक तडवी, रंजीत भालेराव, हर्षल आंबेकर, इम्राण पिंजारी, मिलिंद जंजाळे, राहुल जयकर, फिरोज तडवी आदींसह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

या निवडीमुळे शब्बीर खान यांच्यावर संघटनेची जबाबदारी वाढली असून त्यांनी पुढील काळात पत्रकारांच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments