पत्रकार नरेंद्र रायसिंग यांच्या पाठपुराव्याला यश; जळगाव जिल्ह्यात जन्म-मृत्यू नोंदणीचे आदेश पुन्हा सुरू! चोपडा तहसिलदारांची उत्कृष्ट कामगिर...
पत्रकार नरेंद्र रायसिंग यांच्या पाठपुराव्याला यश; जळगाव जिल्ह्यात जन्म-मृत्यू नोंदणीचे आदेश पुन्हा सुरू!
चोपडा तहसिलदारांची उत्कृष्ट कामगिरी; प्रशासनाच्या सकारात्मक निर्णयामुळे विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा; जिव्हाळ्याच्या प्रश्नावर अखेर तोडगा.
धुळे/ - नरेंद्र रायसिंग ( अधिकृत पत्रकार )
मो. 8999838651
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्ह्यात गेल्या एक वर्षापासून तांत्रिक कारणांमुळे स्थगित असलेले विलंबाने होणारे जन्म व मृत्यू नोंदणीचे आदेश अखेर पुन्हा सुरू झाले आहेत. पत्रकार नरेंद्र रायसिंग यांनी या गंभीर प्रश्नावर प्रशासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, यामुळे विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांचा मोठा अडथळा दूर झाला आहे.
चोपडा तहसिलदारांची उत्कृष्ट कामगिरी: या संपूर्ण प्रक्रियेत चोपडा तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी अत्यंत संवेदनशील आणि कार्यक्षम भूमिका बजावली आहे. सर्वसामान्य नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी महसूल विभागामार्फत या प्रकरणांचा सखोल अभ्यास केला. कायद्याच्या चौकटीत राहून आणि कागदपत्रांची योग्य पडताळणी करून विलंबाने होणाऱ्या नोंदणीचे आदेश देण्यास त्यांनी तातडीने सुरुवात केली. महसूल विभागाच्या या तत्परतेमुळे आणि उत्कृष्ट नियोजनामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना मोठा आधार : शालेय प्रवेश, शिष्यवृत्ती, शैक्षणिक कागदपत्रे तसेच नोकरीसाठी जन्म दाखला अनिवार्य असतो. दुसरीकडे, वारसा हक्क किंवा शासकीय व निमशासकीय योजनांसाठी मृत्यू दाखल्याची गरज असते. तसेच गेल्या वर्षभरापासून ही प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले होते. मात्र, आता हे आदेश सुरू झाल्याने पालकांवरील मोठे ओझे हलके झाले आहे.
भारतीय संविधानातील लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची ताकद :पत्रकार नरेंद्र रायसिंग यांनी हा प्रश्न केवळ मांडलाच नाही, तर त्याचा पाठपुरावा करून तो तडीस नेला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आणि तहसिलदारांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आज जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना व सामान्य नागरिकांना न्याय मिळाला आहे. प्रशासकीय अधिकारी आणि सजग पत्रकार यांनी एकत्र येऊन काम केल्यास जनतेचे प्रश्न कसे सुटू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
No comments