सावखेडा पुलाच्या पुनर्बांधणीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचेकडे आमदार चंद्रकांत सोनवणे यांची निवेदनाद्वार...
सावखेडा पुलाच्या पुनर्बांधणीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचेकडे आमदार चंद्रकांत सोनवणे यांची निवेदनाद्वारे मागणी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड )
दिनांक १८ मे २०२६ रोजी आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची भेट घेत सावखेडा पुलाच्या पुनर्बांधणीबाबत महत्त्वपूर्ण निवेदन दिले. यावेळी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पुलाची पुनर्बांधणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच राज्य महामार्ग क्रमांक ४० वर गोरगावले बु. गावात बायपास रस्ता करण्यात यावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मंत्री महोदयांनी या मागण्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान जळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ. गौरवदादा सोनवणे हे उपस्थित होते.


No comments