adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रंजनकुमार शर्मा यांनी कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला, कायदा आणि सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य देणार!

रंजनकुमार शर्मा यांनी कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला, कायदा आणि सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य देणार!   (कोल्हापूर ज...

रंजनकुमार शर्मा यांनी कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला, कायदा आणि सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य देणार! 



(कोल्हापूर जिल्हा) रणजित मस्के प्रतिनिधी. 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची पुण्याला बदली झाल्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर नव्याने विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून रंजनकुमार शर्मा यांनी आज रोजी कोल्हापूर परिक्षेत्राचा पदभार स्वीकारला आहे. मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गेले साडेतीन वर्षाच्या कार्यकाळात कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक पदाचा पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील राहिले, मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या बदल्यामध्ये सुनील फुलारी यांची पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली आहे. आता नव्याने कोल्हापूर प्रशासनात रंजनकुमार शर्मा यांची इंट्री झाली आहे. 2006 बॅचचे आयपीएस असलेल्या अधिकारी रंजनकुमार शर्मा यांनी यापूर्वी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सीआयडी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून उल्लेखनी कामगिरी बजावली आहे. सध्या पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. हसमुख,अभ्यास व आणि कडक शिस्तप्रिय ओळख असलेल्या शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आता कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली आणि पुणे या जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेची मोठी जबाबदारी असणार आहे. त्यांच्या नव्या नियुक्तीमुळे कोल्हापूर परिक्षेत्रात गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होणार असल्याचे चर्चा पोलीस वर्तुळात आहे. नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पदभार घेताच मावळते पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत कोल्हापूर परिक्षेत्राचा पदभार सोपविला आहे.

No comments