adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रगनकांना जनगणना नोंदणीसाठी सहकार्य करा यावल न पा नगराध्यक्ष व मुख्य अधिकारी

  प्रगनकांना जनगणना नोंदणीसाठी सहकार्य करा यावल न पा नगराध्यक्ष व मुख्य अधिकारी भरत कोळी यावल प्रतिनिधी:- (संपादक :- हेमकांत गायकवाड) यावल न...

 प्रगनकांना जनगणना नोंदणीसाठी सहकार्य करा यावल न पा नगराध्यक्ष व मुख्य अधिकारी


भरत कोळी यावल प्रतिनिधी:-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

यावल नगरपालिका क्षेत्रात जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यास प्रारंभ झाला असूनया मोहिमेसाठी यावल नगरपालिका प्रशासन सज्ज आहे .

नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्या मार्गदर्शना खाली जनगणना टीम यावल शहरात प्रत्यक्षात काम सुरू केले आहे .सदरचे काम 16 मे 26 पासून सुरू झालेली असून हे काम 14 जून 26 या कालावधीमध्ये राबवण्यात येत आहे . शहरातील नागरिकांनी विविध माहिती संकलित करण्यासाठी प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याला आपापल्या घरी आल्यानंतर माहिती पुरवावी व प्रशासनाला सहकार्य करावे एखादी इसमाचे घर बंद असते यावेळी असे प्रगणक आमच्याकडे आलेले नाही अशा तक्रारी होतात त्यासाठी एखादी ची जनगणना न झाल्यास किंवा नजरचुकीने राहिल्यास या कालावधीत नगरपालिकेत प्रत्यक्ष येऊन भेट द्यावी व जनगणना करून घ्यावी असे आवाहन नगरपालिका नगराध्यक्षा सौ छायाताई अलुल पाटील व मुख्याधिकारी श्री .निशिकांत गवई यांनी केले आहे .

नगराध्यक्षांचे आवाहन

यावल नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांनी जनगणनेसाठी प्रगणकांना सहकार्य करावे व जनगणना हे आपल्या देशाचे भविष्य असूनसर्व नागरिकांनी त्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे..

No comments