यावल येथे श्री जिवा महाले नाभिक बहुउद्देशीय संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न भरत कोळी यावल प्रतिनिधी :- (संपादक :- हेमकांत गायकवाड) ...
यावल येथे श्री जिवा महाले नाभिक बहुउद्देशीय संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
भरत कोळी यावल प्रतिनिधी :-
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
यावल येथील श्री जिवा महाले नाभिक बहुउद्देशीय संस्था, यावल यांच्या वतीने आज दुपारी ठीक १ वाजता दिनांक १६ मे २०२६ रोजी शनिवारच्या दिवशी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. सभेमध्ये संस्थेच्या फेरफार नोंदणी कामी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
यावेळी सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी विद्यमान कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेत उपस्थित सर्व सभासदांनी एकमताने हा ठराव मंजूर केला.
तसेच यावल येथील सर्व दुकानदार नाभिक बांधवांना संस्थेकडून ओळखपत्रांचे (आयकार्ड) वितरण करण्यात आले. हे वितरण मा. श्री रफीक सर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात नव्याने निवड झालेल्या कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ तसेच दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांचे आभार मानले..

No comments