adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचा बारावी निकाल जाहीर

इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचा बारावी निकाल जाहीर : विज्ञान 100% तर कला 96.57%  धरणगाव (प्रतिनिधी) : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) येथील इ...

इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचा बारावी निकाल जाहीर : विज्ञान 100% तर कला 96.57% 


धरणगाव (प्रतिनिधी) :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी (2026) चा निकाल उत्साहात जाहीर करण्यात आला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करत विद्यालयाची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. यावर्षी विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. सृष्टी नवल गुजर हिने 88.50% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कावेरी ज्ञानेश्वर चौधरी हिने 87.30% गुणांसह द्वितीय स्थान मिळवले, तर मोहनीश दीपक पाटील आणि नयन उमेश ब्राह्मणकर यांनी 85.50% गुणांसह संयुक्त तृतीय क्रमांक मिळवला.
कला शाखेचाही निकाल समाधानकारक लागला असून एकूण 96.57% निकाल नोंदवला गेला. या शाखेत दिव्या दिनकर माळी हिने 80.00% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. अर्चना तुळशीराम भोई आणि काजल दिलीप बडगुजर यांनी 78.17% गुणांसह संयुक्त द्वितीय क्रमांक पटकावला, तर किरण शाम माळी हिने 77.50% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डी. जी. पाटील, सचिव सी. के. पाटील, संचालक मच्छिंद्र पाटील व भरत पाटील, प्राचार्या सुरेखा पाटील, पर्यवेक्षक ए. एस. पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले. विद्यालयाच्या या उज्ज्वल निकालामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

No comments