adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग १३ मध्ये भव्य आरोग्य शिबिर संध्या महाजन नगरसेविका आणि नरेश महाजन यांचे लोकहिताचे उपक्रम

 मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग १३ मध्ये भव्य आरोग्य शिबिर संध्या महाजन नगरसेविका आणि नरेश महाजन यांचे लोकहिताचे उपक्रम  ...

 मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग १३ मध्ये भव्य आरोग्य शिबिर

संध्या महाजन नगरसेविका आणि नरेश महाजन यांचे लोकहिताचे उपक्रम 


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १३,मल्हारपुरा येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.संध्या नरेश महाजन, नगरसेविका प्रभाग क्रमांक १३ तथा भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष आणि नरेश महाजन यांच्या पुढाकारातून आयोजित हे शिबिर दि.१६ एप्रिल रोजी कन्या शाळा क्रमांक २ येथे उत्साहात पार पडले.

या आरोग्य शिबिराचा शहरातील सुमारे २०० ते २२५ महिला-पुरुष नागरिकांनी लाभ घेतला.शिबिरात डॉ.नानासो डी.ओ.पाटील,डॉ.अशोक कदम,डॉ.सागर पाटील व डॉ.गौरव नेवे यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक आरोग्य मार्गदर्शन केले.काही रुग्णांना पुढील वैद्यकीय तपासण्या करण्याचा सल्ला देण्यात आला, तर पात्र लाभार्थींना महात्मा ज्योतीराव फुले जण आरोग्य योजना अंतर्गत उपचार व योजनांची माहिती देण्यात आली. 


शिबिरात डायबेटीस, फुफ्फुसांचे विकार,पोटाचे आजार,लिव्हर,सोरायसिस, कावीळ तसेच अस्थिरोग आदी आजारांची तपासणी करण्यात आली.नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले.

या प्रसंगी नगरसेवक डॉ.रोहन पाटील,तालुकाप्रमुख कांतीलाल,सरचिटणीस अशोक शिंपी,भाजपा शहराध्यक्ष वैशाली भावसार,वैशाली माळी आदी मान्यवरांनी भेट देऊन उपक्रमाचे अभिनंदन केले.तसेच जितेंद्र महाजन,भैय्या महाजन,गिरीश महाजन,आप्पाराज व बाळा माळी यांचे सहकार्य लाभले.

No comments