फैजपूर शहरात सिंधी समाज मंदिर गोधडीवाला धाम येथे दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न इदू पिंजारी | फैजपूर (संपादक -:- .हेमकांत गा...
फैजपूर शहरात सिंधी समाज मंदिर गोधडीवाला धाम येथे दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
इदू पिंजारी | फैजपूर
(संपादक -:- .हेमकांत गायकवाड)
फैजपूर शहरातील सिंधी समाज मंदिर गोधडीवाला धाम येथे दिनांक १४ व १५ मे रोजी दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमादरम्यान साई झूलेलाल बाबा, हरदासराम बाबा आणि गेलाराम बाबा यांच्या मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १४ मे रोजी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत सिंधी समाज बांधवांसह भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशे, धार्मिक जयघोष आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
१५ मे रोजी जळगाव दरबारचे साई देविदास साई यांच्या शुभहस्ते मूर्ती प्रतिष्ठापना विधी संपन्न झाला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून साई सुनील बाबा उदासी (भुसावळ), श्री महामंडलेश्वर जनार्धन हरिजी महाराज तसेच श्री महामंडलेश्वर पवनदासजी महाराज उपस्थित होते.
सकाळी ११ वाजता मूर्ती प्रतिष्ठापना विधी पार पडला. त्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसाद व महाभोजनास सुरुवात करण्यात आली. सायंकाळी ४ वाजता कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या धार्मिक कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे मान्यवर, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, भक्तगण व पाहुण्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमास सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, भक्तगण आणि पाहुण्यांचे आयोजकांतर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी फैजपूर शहरातील सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments