adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कुरवेल येथे जनजागृती करून जागतिक डेंग्यू दिवस साजरा डेंग्यू, चिकूनगुनिया व मलेरियाबाबत ग्रामस्थांना दिली आरोग्यविषयक माहिती

कुरवेल येथे जनजागृती करून जागतिक डेंग्यू दिवस साजरा डेंग्यू, चिकूनगुनिया व मलेरियाबाबत ग्रामस्थांना दिली आरोग्यविषयक माहिती  चोपडा प्रतिनिधी...

कुरवेल येथे जनजागृती करून जागतिक डेंग्यू दिवस साजरा

डेंग्यू, चिकूनगुनिया व मलेरियाबाबत ग्रामस्थांना दिली आरोग्यविषयक माहिती 


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर तथा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद यशवंतराव सोनवणे यांच्या सूचनेनुसार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दिनांक १६ मे २०२६ रोजी जागतिक डेंग्यू दिनानिमित्त प्रा. आरोग्य केंद्र चहार्डी अंतर्गत उपकेंद्र कुरवेल येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कुरवेल ग्रामपंचायत कार्यालयाच्या चौकात आयोजित या कार्यक्रमात डासांमुळे होणारे डेंग्यू, चिकूनगुनिया आणि मलेरिया या आजारांविषयी ग्रामस्थांना प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. ग्रामस्थांमध्ये डेंग्यू आजाराबाबत जागरूकता निर्माण करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
तालुका हिवताप पर्यवेक्षक जगदीश बाविस्कर आणि तालुका आरोग्य सहाय्यक विजय देशमुख यांनी उपस्थित ग्रामस्थांना विविध आजारांची लक्षणे व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय समजावून सांगितले. यावेळी हिवताप (व्हायरल फिव्हर) विषयी माहिती देताना अचानक ताप येणे, अंगदुखी, डोकेदुखी आणि थकवा ही प्रमुख लक्षणे असल्याचे सांगण्यात आले. पुरेसे पाणी पिणे, विश्रांती घेणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डेंग्यू हा एडीस डासांमुळे होणारा आजार असून सकाळी व संध्याकाळी चावणाऱ्या या डासांपासून बचाव करण्यासाठी घराभोवती पाणी साचू न देणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे तसेच मच्छरदाणीचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. मलेरिया हा अनोफिलीस डासांमुळे होतो. तापासोबत थंडी व घाम येणे ही त्याची प्रमुख लक्षणे असून वेळेवर उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, अशी माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. ग्रामस्थांना दर आठवड्याला घराभोवती पाणी साचलेली ठिकाणे तपासण्याचे तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी “माझे गाव – आरोग्य संपन्न गाव” ही शपथ घेत डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधाचे संदेश आपल्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. यावेळी आरोग्य पथकाकडून जनजागृतीपर कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. तसेच संशयित ताप रुग्णांचे रक्त नमुने घेऊन किरकोळ उपचारही करण्यात आले.प्रसंगी आरोग्य सेवक अरविंद पाटील, आरोग्य सेविका छाया धनगर, गट प्रवर्तक, आशा स्वयंसेविका तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments