पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना चोपडा काँग्रेसतर्फे अभिवादन कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, चोपडा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना चोपडा काँग्रेसतर्फे अभिवादन 
कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, चोपडा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करताना काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
चोपडा प्रतिनिधी
संपादक हेमकांत गायकवाड)
चोपडा:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त चोपडा काँग्रेसतर्फे कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, चोपडा येथे त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
दि. ३१ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या समाजहिताच्या कार्याचे स्मरण केले. त्यांनी केलेल्या लोककल्याणकारी कामांचा आदर्श समाजापुढे ठेवत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे, शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, तापी सहकारी सूतगिरणीचे संचालक एस. डी. पाटील, नगरसेवक रमाकांत ठाकूर, चोसाका संचालक गोपाल धनगर, चोपडा शेतकी संघ संचालक देविदास धनगर, अशोक साळुंखे, विलास दारुंटे, व्ही. के. पाटील, युवराज पाटील, रमाकांत सोनवणे, शशिकांत साळुंखे, दीपक चौधरी, प्रवीण सोनवणे, दीपक विसावे, अकिल भाई यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
No comments