adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व सेवानिवृत्ती निमित्त समारंभाचे आयोजन

 ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व सेवानिवृत्ती निमित्त समारंभाचे आयोजन  किरण धायले मुक्ताईनगर (संपादक...

 ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व सेवानिवृत्ती निमित्त समारंभाचे आयोजन 


किरण धायले मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

               ज्ञानोदय मंडळ अंतुर्ली संचालित ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय अंतुर्ली येथे होळकर घराण्याच्या तत्त्वज्ञानी राणी, लोकमाता, स्वाभिमानी राज्यकर्त्या, दानशूर ,कर्तुत्ववान ,धर्मपरायण, कार्यक्षम राज्यकर्त्या ,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करताना वाचनालयाचे अध्यक्ष एस. ए. भोई, अंतुर्ली पोलीस औट पोस्टचे जमादार विजय पढार साहेब, उपाध्यक्ष शरद महाजन, संचालक  रवींद्र महाजन,पोलीस पाटील किशोर मेढे, सेवानिवृत्त प्राचार्य बी डी बारी सर, नवनियुक्त प्राचार्य किशोर मेढे , चुनीलाल सोनवणे, कौतिक सोनवणे, पत्रकार शेख सर, भाऊराव महाजन, अर्जुन  धनगर,सेवानिवृत पिग्मी एजन्ट उखर्डु बोरसे,  गायत्री पतसंस्थेचे व्यवस्थापक गणेश न्हाव्हकर, शे . भैय्या शे करीम व  मान्यवर, वाचक समाज बांधव उपस्थित होते.

          याप्रसंगी ज्ञानोदय मंडळ अंतुर्ली संचलित ज्ञानपूर्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेज इच्छापुर निमखेडी येथील सेवानिवृत्त प्राचार्य बी डी बारी सर, सेवानिवृत्त गायत्री पतसंस्थेचे पिग्मी एजंट उखर्डु बोरसे, ज्ञानपूर्ण विद्यालय व जुनिअर कॉलेज इच्छापुर निमखेडी येथे नवनियुक्त प्राचार्य तथा मुख्याध्यापक किशोर मेढे यांचा संस्थेच्या वतीने *शाल श्रीफळ व कृतज्ञता पुरस्कार* देऊन सत्कार करण्यात आला.

                 याप्रसंगी एस ए भोईसर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या इंदूरच्या होळकर घराण्याच्या कर्तबगार, शासिका. पती व मुलाच्या निधनानंतर त्यांनी तीस वर्षे राज्य कारभार केला.कर जोडूनी प्रजेचा कर माफ केला.  धर्म जपला, धर्मशाळा बांधूनी पुण्य केले. धर्मराज्याची कीर्ती त्रिभुवनी यातूनच त्या धर्मवीर ठरल्या , त्यांनी काशी विश्वनाथ, सोमनाथ आणि गया येथील  मंदिराचा जिर्णोद्वार केला.त्यांचा शिस्तबद्ध राज्यकारभार, शेतकऱ्यांना सवलती ,स्त्रियांचा सन्मान, कुशल प्रशासक ,जनहित दक्ष राजमाता म्हणून लोक त्यांना देवी मानत .त्यांचे शासन म्हणजे प्रजाहितदक्ष ,राजधर्माचा उत्तम नमुना होता. त्यांनी इंदोर पासून ते नागपूर पर्यंत व औरंगाबाद पर्यंत दर दोन - दोन कोसावर पायविहिरी बांधल्या. त्या महादेवाच्या भक्त होत्या त्यांनी अडीचशे वर्षांपूर्वी अंतुरली येथे महादेवाचे मंदिर बांधले ते आजही नक्षीकाम व रंग जसेच्या तसे आहे. त्यांनी बांधलेल्या अंतुरलीची पाय विहिरीतून गावाला पाणीपुरवठा होत  होता. त्यांनी ठीक ठिकाणी लष्कराला राहण्यासाठी धर्मशाळा बांधल्या होत्या. विधवा महिलांना संपत्तीचा आणि दत्तक विधानाचा हक्क मिळवून दिला. अशा अशा या अहिल्यादेवी होळकरांना कोटी कोटी नमन 

              त्याचप्रमाणे ज्ञानोदय मंडळ अंतुर्ली चे संस्थापक डॉक्टर आर एस दर्यापूरकर व  संस्थापक एस ए भोई व त्यांचे संचालक मंडळ  56 वर्षापासून  आजही  अविरत सेवा देत आहेत, ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय अंतुर्ली,रा.गो.ज्ञानोदय विद्यालय कर्की ,ज्ञानपूर्ण विद्यालय व जुनिअर कॉलेज इच्छापुर निमखेडी या शाखा सुस्थितीत सुरू आहेत.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल वाडीले यांनी केले आभार अनिल न्हावकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण धायले, शांताराम महाजन, नितीन भोई, हेमराज सोनवणे, एस.एस भोई, भास्कर सोनवणे, भानुदास पाटील यांनी  परिश्रम घेतले.

No comments