adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीचे भान ठेवणारे व्यक्तिमत्व: माजी आमदार कैलास बापू पाटील.

 लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीचे भान ठेवणारे व्यक्तिमत्व: माजी आमदार कैलास बापू पाटील (चंद्रकांत पाटील विचखेडा यांजकडून):- चोपडा तालुक्यात गे...

 लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीचे भान ठेवणारे व्यक्तिमत्व: माजी आमदार कैलास बापू पाटील



(चंद्रकांत पाटील विचखेडा यांजकडून):- चोपडा तालुक्यात गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने राजकारण समाजकारण सहकार क्षेत्रात काम करणारे लोकप्रतिनिधी म्हणून कैलास बापू पाटील यांच्याकडे पाहिले जाते. शांत, मितभाषी, मृदू स्वभाव, आणि मुखात सदैव नागेश्वर महादेवाचे चिंतन करताना ते पहाटे पाच ते रात्री 10 पर्यंत सतत कार्यरत राहतात. शुद्ध शाकाहारी व्यसनांपासून दूर राहून बापूंनी कठोरा सारख्या गावात राहून आपल्या परिवाराची जडणघडण केली. सहकार क्षेत्रात चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पहिली निवडणूक आम्ही बरोबर लढवलेली आहे. स्वर्गवासी धोंडू आप्पा पाटील यांचे लाडके बापू यांचा लोकसंग्रह विलक्षण आहे. तालुक्यात कुठेही कुणाकडेही निसंकोच पणे जातात म्हणून तालुका वासियांच्या साहजिकच त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. कुणाच्या सुखदुःखात धावून जाणे ही सत प्रवृत्ती आहे. चोपडा तालुका तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन असूनही ते अत्यंत दिलदार व मनमिळाऊ आहेत. वलयांकित व्यक्तिमत्व कसे असावे व जनमानसात त्यांचे स्थान कुठे असते याचा आदर्श वस्तू पाठबापूंनी सर्व कार्यकर्त्यांच्या समक्ष घालून दिला आहे. राजकारणासह सहकार क्षेत्र यात बापूंचा प्रचंड अभ्यास आहे. आठवड्यातून 24 तास त्यांचे महादेवाच्या चरणी समर्पित असतात. धार्मिक कार्यात मग तो कुठलाही देव असो सर्वांना मदत करणे हा त्यांचा माणुसकी धर्म आहे. केवळ मराठा समाजातच नाही तर गुजर, माळी, गुजराती मारवाडी आदिअठरा पगड जाती धर्मात त्यांना मानणारा वर्ग आहे. अधिकारी पदाधिकारी ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते यांच्या संपर्कात राहून कैलास बापू यांनी आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तालुक्यात गावोगावी असंख्य कार्यकर्ते त्यांचे अनुयायी आहेत. पाखंडी भक्तीला थारा न देता प्रत्यक्ष काम करणारा माणूस कार्यकर्ता जोपासण्याचे काम कैलास बापू करतात. अशा निगर्वी स्वभावाच्या महादेव भक्ताला अनेक जण कैलास महाराज म्हणतात. आज एक जून त्यांचा वाढदिवस त्या निमित्ताने त्यांना अनेक अनेक अभिष्टचिंतने..

संकलन 

रमेश जे .पाटील, (कवी) आडगाव तालुका चोपडा जिल्हा जळगाव

No comments