वरसविहीर एसटी बस वेळेवर सुटत नसल्याने प्रवाशांचे हाल प्रवाशांची मोठी गैरसोय त्रंबकेश्वर बसस्थानकातील प्रकार प्रतिनिधी जयवंत हागोटे त्र...
वरसविहीर एसटी बस वेळेवर सुटत नसल्याने प्रवाशांचे हाल
प्रवाशांची मोठी गैरसोय त्रंबकेश्वर बसस्थानकातील प्रकार
प्रतिनिधी जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
त्र्यंबकेश्वर बस स्थानकामधून एसटी बस वेळेवर सुटत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष देणे काळाची गरज आहे त्र्यंबकेश्वर हा तालुका असल्याने या ठिकाणी शासकीय कार्यालये आहेत बँका, रुग्णालय आणि मंगळवारी आठवडे बाजार भरत असतो यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक त्रंबकेश्वरला येत असतात त्र्यंबकेश्वर ते वरसविहीर बस सेवा सकाळी व दुपारी चालू करण्यात आली आहे पण ही बस वेळेवर सुटत नाही प्रवाशांची तक्रार आहे प्रवाशांनी बस संदर्भात आगार प्रमुखांना विचारणा केली असता आगरांचे प्रमुखांचे उत्तर येते की बस डेपोतून वेळेवर येत नाही म्हणून बस वेळेस सुटत नाही असे उडवा उडवीचे उत्तर प्रवाशांना देत असतात प्रवाशांना तासंतास बस स्थानकामध्ये एसटी बसची वाट पहावी लागते यामध्ये एम.एस. सी.आय.टी,टायपिंगला येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे तसेच रुग्ण,वृद्ध,महिला यांनाही गावाकडे जाण्यासाठी वेळेत बस लागत नाही सायंकाळपर्यंत एसटी बसची वाट पहावी लागते कधी कधी तर दुपारची बस कॅन्सल करण्यात येते त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागतो त्र्यंबकेश्वर बस स्थानकातून सुटणारी बस वेळेत लागावी अशी मागणी विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रवासी यांच्याकडून होत आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे त्र्यंबकेश्वर वरसविहीर ही बस वेळेस सुटत नसल्यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनी प्रवासी यांच्याकडून आंदोलनाचा इशारा ही देण्यात आला आहे याची दक्षता आगार प्रमुखांनी घ्यावी

No comments