औषध विक्रेत्यांच्या भारत बंदमध्ये ग्रामीण भागातूनही सक्रिय सहभाग मच्छिंद्र कोळी गलंगी (ता. चोपडा) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ऑनलाइन औषध व...
औषध विक्रेत्यांच्या भारत बंदमध्ये ग्रामीण भागातूनही सक्रिय सहभाग
मच्छिंद्र कोळी गलंगी (ता. चोपडा)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ऑनलाइन औषध विक्रीमुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांपुढे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर 20 मे 2026 रोजी देशभरातील औषधी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या हितासाठी ऑनलाइन औषध विक्री बंद करण्यात यावी, या मागणीसाठी ऑल इंडिया केमिस्ट संघटनेने हा बंद पुकारला आहे.
या बंदचा परिणाम मोठ्या शहरांबरोबरच जिल्हा व तालुका स्तरावरही दिसून येणार असून आता खेड्यापाड्यातील औषध विक्रेत्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागातील लहान गावांपर्यंत ऑनलाइन व्यवसायाचे लोण पोहोचल्याने स्थानिक औषध विक्रेत्यांची आर्थिक स्थिती बिकट होत असल्याची भावना अनेक विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
“ऑनलाइन औषध विक्रीमुळे ग्राहक थेट मोबाईलवरून औषधे मागवत आहेत. त्यामुळे छोट्या गावांतील मेडिकल व्यवसायावर मोठा परिणाम होत असून पारंपरिक विक्रेते अडचणीत आले आहेत,” अशी खंत एका औषध विक्रेत्याने ‘प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
दरम्यान, गणपूर (ता. चोपडा) येथे औषध विक्रेते संजय पाटील यांनी दुकान बंद ठेवण्याचा निर्णय फलकाद्वारे जाहीर करत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे ग्रामीण भागातही या बंदला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

No comments