adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंतुर्ली पोलीस औट पोस्ट येथे नवनियुक्त पोलीस अंमलदार श्री पवन सपकाळ यांचा सन्मान

 अंतुर्ली पोलीस औट पोस्ट येथे नवनियुक्त पोलीस अंमलदार श्री पवन सपकाळ यांचा सन्मान  किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ता...

 अंतुर्ली पोलीस औट पोस्ट येथे नवनियुक्त पोलीस अंमलदार श्री पवन सपकाळ यांचा सन्मान 


किरण धायले मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत , अंतुर्ली पोलीस आऊट पोस्ट येथे नव्याने नियुक्त झालेले पोलीस अंमलदार श्री पवन सपकाळ यांचा गावकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाचे प्रदेश सचिव अनिल वाडीले, भ्रष्टाचार अत्याचार समितीचे शेख भैय्या शेख करीम ,सामाजिक कार्यकर्ते किरण धायले यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी पोलीस पाटील किशोर मेढे, पो. कॉ. मुकेश महाजन, पो.कॉ. संदीप खवले,पो. कॉ. राजेश महाजन, मान्यवर उपस्थित होते.

       कायदा व सुव्यवस्था अबाधित कशी  राहील यासाठी प्रयत्न करावे ,कोणावरही अन्याय होणार नाही, योग्य तो न्याय पिडीतांना देण्यात यावा,सर्वांना समानतेची वागणूक देण्यात यावी, परिसरात रात्रीच्या वेळी गस्त  घालण्यात यावी, वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रहदारीच्या ठिकाणी बराकेट्स लावण्याची व्यवस्था करण्यात यावी  अशी विनंती अनिल वाडीले यांनी केली. पोलीस अंमलदार पवन दादा सपकाळ यांनी शक्य तितकी अंमलबजावणी करण्यात येईल अशी ग्वाही दिली.

       त्याचप्रमाणे पो. कॉ. संदीप खवले, पो.कॉ. मुकेश महाजन यांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला

No comments