गणपूर येथे पीक संस्थेच्या चेअरमनपदी अमृत पाटील यांची निवड विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चौगाव(ता चोपडा) ता 17: येथील पी...
गणपूर येथे पीक संस्थेच्या चेअरमनपदी अमृत पाटील यांची निवड
विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चौगाव(ता चोपडा) ता 17: येथील पीक संरक्षण सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी अमृत छगन पाटील यांची तर व्हा.चेअरमन पदी उज्वलसिंग मोहनसिंग राजपूत यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीला सर्व सदस्य उपस्थित होते. बैठकीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सदस्य व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला..... गणपूर (ता चोपडा) नवनिर्वाचित चेअरमन व व्हा चेअरमन यांचा सत्कार करताना पदाधिकारी

No comments