नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या भव्य गुणगौरव सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र नाभिक महामंडळ व जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक...
नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या भव्य गुणगौरव सोहळ्याचे आयोजन
महाराष्ट्र नाभिक महामंडळ व जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
शिरपूर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शिरपूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर तालुका व शहरातील नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य “गुणगौरव सोहळा” येत्या जून महिन्यात उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात येणार आहे.
गेल्या पाच वर्षांपासून अखंड व अविरतपणे सुरू असलेल्या या उपक्रमामधून समाजातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या यशाचा सन्मान करण्यात येतो. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत उल्लेखनीय यश संपादन करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.
समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून उंच भरारी घ्यावी, त्यांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळावे तसेच पुढील वाटचालीस प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यासाठी समाजातील सर्व पालक, विद्यार्थी व समाजबांधवांना आवाहन करण्यात आले असून, आपल्या पाल्याचे सन 2025-26 मध्ये उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, मार्कशीट अथवा रिझल्ट कॉपी लवकरात लवकर खालील ठिकाणी जमा कराव्यात, असे कळविण्यात आले आहे.
प्रमाणपत्र जमा करण्याचे ठिकाण :
राज मेन्स पार्लर, करवंद नाका, शिरपूर
समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करून त्यांचे मनोबल वाढविण्यासह शिक्षणाची प्रेरणा प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा हा स्तुत्य प्रयत्न असल्याची भावना समाजबांधवांकडून व्यक्त होत आहे.
“विद्यार्थ्यांचा गौरव म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान.”
— आपलाच समाज बंधू, रामविकास

No comments