शेतकऱ्यांना शेतीची वीज वेळेवर मिळत नसल्याने संताप प्रतिनिधी रविंद्र कोळी (संपादक :- हेमकांत गायकवाड) वर्डी परिसरातील अनेक गावांमध्ये शेतकऱ...
शेतकऱ्यांना शेतीची वीज वेळेवर मिळत नसल्याने संताप
प्रतिनिधी रविंद्र कोळी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
वर्डी परिसरातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी वीजपुरवठा वेळेवर मिळत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. Maharashtra State Electricity Distribution Company Limited कडून दिल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्यात वारंवार खंड पडत असून ठरलेल्या वेळेत लाईट मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
सध्या पिकांना पाण्याची अत्यंत गरज असताना रात्री उशिरा किंवा कमी वेळ वीज दिली जात असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. अनेक शेतकरी रात्रभर जागून पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अचानक वीज खंडित होत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे.व शेतकऱ्यांना अधीकारी व कर्मचारी उडवा उडवी चे उत्तर देत आहे
याबाबत संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन नियमित व सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही काही शेतकऱ्यांनी दिला आहे.

No comments