अनेर परिसरात खरीपपूर्व हंगामाच्या तयारीला वेग गलंगी ता. चोपडा मच्छिंद्र रायसिंग (संपादक -:- हेमकांत गायकवाड) खरीपपूर्व हंगामाच्या तयारी...
अनेर परिसरात खरीपपूर्व हंगामाच्या तयारीला वेग
गलंगी ता. चोपडा मच्छिंद्र रायसिंग
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खरीपपूर्व हंगामाच्या तयारीला सध्या वेग आला आहे. वातावरणातून उन्हाची तीव्रता कमी होत नसतानाही शेतकरी आपापल्या परीने कापूस व मका लागवडीची तयारी करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गलंगी सह परिसरातील अनेक गावांमध्ये बियाणांच्या विविध कंपन्यांद्वारे जोरदार प्रचार सुरु झाला आहे. गावागावांत दुकानांच्या भिंतींसह मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात बियाणांच्या विविध कंपन्यांनी आपली प्रचार यंत्रणा सक्रिय केली आहे. सर्वत्र ठरावीक वाण लागत असले तरी आपले बियाणे जास्त खपावे यासाठी विविध कंपन्या वेगवेगळे प्रयोग राबवताना दिसत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांना गोळा करून वाणांचीची माहितीही दिली जाते. बाजारात विविध कंपन्यांचे बियाणे कपाशी व मका लागवड वाढणार
टपऱ्यांवर, चौकात पोस्टर्स व बॅनर्स लावले जात आहेत. मका, ज्वारी, बाजरी, कापूस आदी पिकांची माहिती देणारे बॅनर्स व पोस्टर्स सध्या मोठ्या प्रमाणावर झळकू लागले आहेत. काही शिवारात तुरळक प्रमाणात का होईना कृषी विभागाच्या आवाहनाला झुगारून शेतकऱ्यांनी मका व कापूस लागवड सुरू केली आहे. येत्या पंधरवड्यात कापूस, मका लागवड उपलब्ध विभागाकडून करण्यात येत आहे असल्याने प्रत्येक कंपनीकडून आपापल्या बियाणाचा जोरदार प्रचार केला जात आहे. त्यादृष्टीने बियाणांची माहिती देणारे पोस्टर्स व बॅनर्स परिसरात लागले आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी बियाणे खरेदी करताना परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावे, त्याचे पक्के बिल (पावती) घ्यावी आणि बियाण्याचे टॅग व पाकीट पीक निघेपर्यंत जपून ठेवावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.

No comments