जिल्हा परिषद शिक्षक जाफर शेख सत्तार यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ संपन्न रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
जिल्हा परिषद शिक्षक जाफर शेख सत्तार यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ संपन्न
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नशिराबाद येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक जाफर शेख सत्तार यांचा सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात पीर तरीकत जमील हजरत नशिराबाद यांच्या हस्ते कुराण पठण करून करण्यात आली. जाफर शेख सत्तार यांची ४ जुलै १९९२ रोजी जिल्हा परिषद शिक्षण विभागात नियुक्ती झाली होती. त्यांनी आपल्या प्रदीर्घ सेवा प्रवासात पिंपळकोठा सिम ता. एरंडोल येथे १४ वर्षे, रावंजे ता. एरंडोल येथे ६ वर्षे, नशिराबाद कन्या शाळा नं. २ मध्ये ६ वर्षे (२०१२ ते २०१८) आणि केंद्र बॉईज शाळा नं. २ येथे ८ वर्षे (२०१८ ते २०२६) ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. याप्रसंगी नशिराबादचे माजी नगरसेवक तथा जिल्हा परिषद तसेच मोठा वाघोदा बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्य शेख अजीज मन्यार यांच्या हस्ते जाफर शेख यांचा शाल व हार घालून यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.

No comments