adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज, मोठे वाघोदे १२ वीचा निकाल ९६.२९%

 प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज, मोठे वाघोदे १२ वीचा निकाल ९६.२९%  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्याती...

 प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज, मोठे वाघोदे १२ वीचा निकाल ९६.२९% 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा बुद्रुक येथील प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज, मोठे वाघोदे, ता. रावेर एच एस सी चा इयत्ता १२ वीचा विज्ञान शाखेचा निकाल ९९.३४% तर कला शाखेचा निकाल ८९.०६ असा एकूण निकाल ९६.२९% लागला असून विज्ञान शाखेत सार्थक जयंत पाटील हा विद्यार्थी ९२.००% मिळवून प्रथम आला, तर ज्ञानेश्वरी हेमंत नेमाडे ही विद्यार्थीनी ९०.६७% मिळवून द्वितीय तर तृतीय ८९.८३% मिळवून खुशी गोपाल मानकर ही विद्यार्थीनी आली. तर कला शाखेत यामिनी गजानन कोळी ही विद्यार्थीनी ७४.३३% मिळवून प्रथम आली, तर सुवानी युवराज वाघ ही विद्यार्थीनी ७२.५०% मिळवून द्वितीय तर तृतीय ६७.५०% मिळवून आश्विनी रमेश कोळी ही विद्यार्थीनी आली. तसेच विज्ञान शाखेत मागासवर्गीयातून आदित्य विलास वाघ हा विद्यार्थी ८१.८३% तर कला शाखेतून यामिनी गजानन कोळी ही विद्यार्थीनी ७४.३३ मिळवून प्रथम आली. सदर विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री व्ही. एस. महाजन, पर्यवेक्षक श्री आर. पी. बडगुजर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे मार्गदर्शन लाभले व त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष श्री पी. टी. महाजन सर, उपाध्यक्ष श्री श्रावण सिताराम महाजन, चेअरमन श्री डी. के. महाजन, व्हा. चेअरमन श्री विजयकुमार बाजीराव पाटील, सचिव श्री किशोर जगन्नाथ पाटील, सहसचिव श्री. पी. एल. महाजन व सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

No comments