adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेतकऱ्यांना डिझेल/पेट्रोल मशागती साठी विनाशर्त मुबलक मिळावे काँग्रेसची मागणी

 शेतकऱ्यांना डिझेल/पेट्रोल मशागती साठी विनाशर्त  मुबलक मिळावे काँग्रेसची मागणी  किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड)          ...

 शेतकऱ्यांना डिझेल/पेट्रोल मशागती साठी विनाशर्त  मुबलक मिळावे काँग्रेसची मागणी 


किरण धायले मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

           पावसाळा लवकरच सुरू होणार आहे.शेती मध्ये मशागती साठी लागणारे डीजेल ट्रॅक्टर व इतर वाहनांना आधार कार्ड, सातबारा मागणे योग्य नाही. मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. डिझेल मिळाले नाही तर शेती कशी तयार करायची, सर्व पंपावर रांगा लागल्या आहे. डिझेल पेट्रोल मशागती साठी सुरळीत करण्यात यावा. डिझेल टंचाईमुळे शेतकरी संकटात सापडला आहे, अजून कर्जबाजारी होणार आहे. त्वरित उपाय योजना करण्यात यावा. डिझेल कॅनन मध्ये मिळत नाही , त्यासाठी ट्रॅक्टर ची कामे सोडून डिझेलसाठी  ट्रॅक्टर घेऊन डिझेल खर्च करून तासनतास पेट्रोल पंपावर रांगा लावाव्या लागत आहे.

        शेतकऱ्यांना या आठवड्यात कपाशीची लागवड करायची आहे मशागत नागरती , ट्रिलर रोटावेटर रोटावेटर कधी होणार व पेरणी कधी होणार यासाठी शेतकरी चिंतेत आहे. चार चार दिवस शेतकरी पेट्रोल पंपावर भर उन्हात रांगेत त  उपाशी उभा राहतो, मारामाऱ्या  होतात, नाहक  मनस्ताप सहन करावा लागत आहे.डिझेल पंपधारकांना शेतकऱ्यांचा रोष सहन करावा लागत आहे.शेजारील  मध्यप्रदेशात डिझेल पेट्रोल मुबलक प्रमाणात मिळत आहे. इतर राज्याप्रमाणे आपल्याही  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना डिझेल इंधन विना शर्त मिळावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी VJNT विभागाचे प्रदेश सचिव अनिल वाडीले यांनी केली आहे .

No comments