adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्व. निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल; पाचव्यांदा यशाची परंपरा कायम

 स्व. निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल; पाचव्यांदा यशाची परंपरा कायम  प्रा. सतीश गायकवाड मुक्ताईनगर  (संप...

 स्व. निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल; पाचव्यांदा यशाची परंपरा कायम 


प्रा. सतीश गायकवाड मुक्ताईनगर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फेब्रुवारी-मार्च २०२५-२६ मध्ये झालेल्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत मुक्ताईनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुक्ताईनगर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या स्व. निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूलने घवघवीत यश संपादन करत सलग पाचव्यांदा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या ३८ पैकी सर्व ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाच्या या यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यालयातून गितेश ज्ञानेश्वर चौधरी याने ९१.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. ऋतुजा दीपक भगत हिने ८८ टक्के गुणांसह द्वितीय, तर उज्वल गौतम वानखेडे याने ८५.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

तसेच हेमंत विजय खराटे याने ८१.८० टक्के गुणांसह चौथा, रोहित भूषण पाटील याने ८१.४० टक्के गुणांसह पाचवा, तर प्रतिक्षा शशिकांत गलवाडे हिने ८१.२० टक्के गुण मिळवत विद्यालयातून सहावा क्रमांक मिळविला. विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनीही चांगले गुण मिळवत यशाची परंपरा कायम राखली.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच शिक्षकवृंदांचे संस्थेचे अध्यक्ष मा. रमेश महादू खाचणे, संस्थेच्या सचिव तथा केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, संस्थेचे सर्व सदस्य आणि शाळेचे मुख्याध्यापक व्ही. के. वडस्कर यांनी विशेष कौतुक करत अभिनंदन केले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments