कोतवाली पोलिसांनी थेट मध्यप्रदेशातील दुर्गम भागातून चोरट्यांना ठोकल्या बेड्या तब्बल १७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.. सचिन मोकळं अहिल्यानगर (...
कोतवाली पोलिसांनी थेट मध्यप्रदेशातील दुर्गम भागातून चोरट्यांना ठोकल्या बेड्या तब्बल १७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत..
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- साखरपुड्याच्या कार्यक्रमात गर्दीचा फायदा घेऊन दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा कोतवाली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातून एका विधीसंघर्षित बालकासह आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून १७ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.फिर्यादी सिंधु महेश माने (वय ५२,रा. तिसगाव,ता.पाथर्डी) या दि. २/५/२०२६ रोजी त्यांच्या भाचा अशितोष नंदकुमार मरकड याच्या साखरपुड्यासाठी श्रेया गार्डन,केडगाव येथे आल्या होत्या.यावेळी त्यांनी स्वतःचे सोन्याचे दागिने आणि नातेवाईक मेहुणे नंदकुमार मरकड यांनी दिलेली सोन्याची अंगठी अशी एकूण १६ तोळे सोने व २५,००० रुपये रोख एका निळ्या पिशवीत ठेवले होते.फोटो काढण्यासाठी त्या स्टेजवर गेल्या असता, अज्ञात चोरट्यांनी ती पिशवी लंपास केली होती.घटनेचे गांभीर्य ओळखून कोतवाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.तपासा दरम्यान हा गुन्हा मध्यप्रदेशातील कडीया सांसी (ता. पचोर,जि.राजगड) येथील टोळीने केल्याची निष्पन्न झाले.वरिष्ठांच्या आदेशाने स.पो.नि.कुणाल सपकाळे यांच्या नेतृत्वाखालील पथक तत्काळ मध्यप्रदेशात रवाना झाले. स्थानिक बोडा पोलिसांच्या मदतीने अत्यंत दुर्गम आणि संवेदनशील भागात सलग ४ दिवस शोध घेऊन पोलिसांनी एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले व चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.डॉ.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.संभाजी गायकवाड, स.पो.नि.कुणाल सपकाळे,पोउपनि.प्रवीण पाटील, पोउपनि गणेश देशमुख,पोलीस अमलदार विशाल दळवी, विनोद बोरगे,बाळकृष्ण दौंड,साबीर शेख,राहुल शिंदे,संदीप पवार, रोहिणी दरंदले,वर्षा पंडीत,सुरज कदम,दिपक रोहोकले,सत्यजित शिंदे,रमेश शिंदे,अतुल कोतकर, सचिन लोळगे,अमोल गाडे, अतुल लाटे,अतुल काजळे, शिरीष तरटे,राहुल मासाळकर, गंगाधर आंग्रे,किरण बढे,पल्लवी रोहकले व दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु तसेच मध्यप्रदेश येथील बोडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी देवेंद्रसिंह राजपूत,पोलीस अंमलदार कपिल अटारीया,दुष्यंत जाट, महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा मुदेल यांनी केली आहे.

No comments