अंतुर्ली औट पोस्टला नियुक्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार मुक्ताईनगर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर पोलीस स्टेश...
अंतुर्ली औट पोस्टला नियुक्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार
मुक्ताईनगर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत अंतुर्ली औट पोस्ट येथे नव्याने नियुक्त झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा नुकताच सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
यावेळी पोलीस हवालदार विजय पढार, पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव, राहुल तायडे, राजेश महाजन तसेच अंतुर्लीचे पोलीस पाटील किशोर मेढे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व्ही.जे.एन.टी विभागाचे प्रदेश सचिव अनिल वाडीले, अंतुर्ली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख भैय्या शेख करीम तसेच पत्रकार किरण धायले यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्याने नियुक्त झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रभावी कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमास परिसरातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.

No comments