adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिक्षक सुभाष सुरळकर,सौ.निलम पाटील,सौ मंगला अकोटकर राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार ने सन्मानित..

 शिक्षक सुभाष सुरळकर,सौ.निलम पाटील,सौ मंगला अकोटकर राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार  ने सन्मानित..  अमोल बावस्कार बुलढाणा (संपा...

 शिक्षक सुभाष सुरळकर,सौ.निलम पाटील,सौ मंगला अकोटकर राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार  ने सन्मानित.. 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

   मलकापूर :- नुकताच संत श्री साई बाबा यांच्या पावन भूमीत  श्री साईबाबा सांस्कृतिक भवन, शिर्डी येथे महाराष्ट्र शिक्षक फाउंडेशन द्वारा संचालित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान सोहळा मोठया भव्य दिव्य स्वरूपात अध्यक्ष मा श्री चामे सर,सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुले, प्रसिद्ध कवी प्रा.रोहित शिंगे,कवयित्री गुंजन पाटील,शिर्डी संस्थान च्या संचालक,राज्य समन्वयक मा श्री भास्कर डोसे,बुलडाणा  जिल्हा समन्वयक मा श्री निवृत्ती इंगळे सर ,मा श्री मनोहर खंडेराव आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला.सकाळी सर्व पुरस्कारार्थी यांना मानाचे फेटे बांधून ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढून पुष्प वृष्टी करण्यात आली.त्यानंतर सभागृहात मान्यवारांच्या हस्ते दीप प्रज्वलन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली .मान्यवरांच्या स्वागतानंतर सकाळच्या सत्रात  भक्ती गिते ,भाव गिते,भरत नाट्यम,सिनेमा गिते,सतार वादन,बासरी वादन असा खुप मनोरंजक व बहारदार कार्यक्रम संपन्न झाला .भोजनानंतर दुपारच्या सत्रात प्रत्यक्ष पुरस्कार वितरण मान्यवरांच्या हस्ते श्री सुभाष भगवान सुरळकर ता.जळगाव जा. सौ निलम संजयसिंग पाटील ता.मलकापूर, सौ मंगला पातळे अकोटकर ता.जळगाव जा.आदी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या पुरस्कारार्थिना राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार शाल श्रीफळ बुके सन्मान पत्र सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

प्रसिद्द कवी व कवयित्री प्रा रोहित शिंगे व गुंजन पाटील यांनी भावनिक,प्रेमाच्या व शिक्षकांचा सन्मान वाढवणाऱ्या खुप छान कविता सादर केल्यात.प्रमुख अतिथी सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी शिक्षकांना शासनाने शिक्षणा व्यतिरिक्त 150 प्रकारची अशैक्षणिक कामे  लादली आहेत .शिक्षकांना शिक्षणाचे काम करू द्यावे हे त्यांनी सुचविले.परंतु निवडणुकी सारखे अत्यंत महत्वाचे काम निरपेक्ष वृत्तीने व जबाबदारीने आमची शिक्षक मंडळी चोख पणे करतात याचा सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले अध्यक्षीय भाषणात मा श्री चामे सरांनी कार्यक्रमाचा छान दर्जा,उत्कृष्ठ नियोजन ,सहा महिन्यांपासून नियोजन शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली...

No comments