मुक्ताईनगरचे मंगेश निळे यांना ‘इन्स्पायरिंग एज्युकेटर अवॉर्ड’; शैक्षणिक कार्याचा गौरव सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवा...
मुक्ताईनगरचे मंगेश निळे यांना ‘इन्स्पायरिंग एज्युकेटर अवॉर्ड’; शैक्षणिक कार्याचा गौरव
सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर येथील श्री समर्थ सायन्स क्लासेस (निळे कोचिंग अकॅडमी) चे समन्वयक व शिक्षक मंगेश जगन्नाथ निळे यांना डॉ. होमी भाभा फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “इन्स्पायरिंग एज्युकेटर अवॉर्ड” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार AYSA – Aspiring Young Scientist Award Ceremony 2025-2026 या कार्यक्रमात १२ मे २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉईंट, मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
शैक्षणिक वर्षभर संस्थेने दिलेल्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल तसेच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल फाउंडेशनकडून मंगेश निळे यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी MSAT (Mathematics & Science Ability Test), GREAT (General Reasoning English Aptitude Test) तसेच RoboQuest यांसारख्या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, विश्लेषणात्मक विचारसरणी आणि नवोन्मेषाची जाणीव निर्माण करण्यासाठी मंगेश निळे यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे फाउंडेशनने नमूद केले आहे. या यशामुळे मुक्ताईनगर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments