adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

काळभैरव माध्यमिक विद्यालय सनपुलेचा दहावीचा निकाल ९२.८५ टक्के

 काळभैरव माध्यमिक विद्यालय सनपुलेचा दहावीचा निकाल 92.85 टक्के  वेले, ता. चोपडा (प्रतिनिधी)  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  वेले परिसरातील सनप...

 काळभैरव माध्यमिक विद्यालय सनपुलेचा दहावीचा निकाल 92.85 टक्के 


वेले, ता. चोपडा (प्रतिनिधी) 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 वेले परिसरातील सनपुले (ता. चोपडा) येथील काळभैरव माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल यंदा 92.85 टक्के लागला असून विद्यालयाने यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यालयातील कु. फाल्गुनी दिनेश पाटील हिने 77 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तर कु. दुर्गेश्वरी ज्ञानेश्वर कोळी हिने 75.80 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच जयेश शिरसाठ याने 73.20 टक्के गुण मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांक मिळवला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments