रावेर तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशन चा मूक मोर्चा मुबारक तडवी रावेर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक 20 रोज बुधवार सकाळी साडेदहा ...
रावेर तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशन चा मूक मोर्चा
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक 20 रोज बुधवार सकाळी साडेदहा वाजता नवजीवन नगरपालिका हॉस्पिटल येथून रावेर तालुका मेडिकल डीलर्स असोसिएशनचा मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मूक मोर्चा शांततेच्या मार्गाने स्टेशन रोड वरून रावेर तहसील कार्यालयात तहसीलदार दिपा जेधे यांना निवेदन देण्यात आले मूक मोर्चा ला मार्गदर्शन करताना लक्ष्मण सावळे यांनी सांगितले कि जीआर 817 याचे कायद्यात रूपांतर करावी व दिल्ली हायकोर्टातील स्थगिती असलेली ऑनलाइन औषधी विक्री बंद करावी व कोरोना काळातील जीएसआर 220 ही चा अंमलबजावणी बंद करावी व कार्पोरेट कंपनीकडून डिस्काउंट च्या माध्यमातून छोटा रिटेल केमिस्ट रिटेल संपवण्याचा डाव आखला जात आहे, मात्र देशातील लाखो केमिस्ट हा अन्याय सहन करणार नाही देशातील प्रत्येक केमिस्ट हा रुग्ण सेवेसी जोडलेला आहे त्यामुळे ही लढाई केवळ केमिस्ट हिताची नाही तर देशातील प्रत्येक रुग्णाच्या सुरक्षित भविष्यासाठीची आहे, विशेष म्हणजे ड्रग अँड कॉस्मेटिक कायदा 1940 आणि 1945 मध्ये ऑनलाईन औषधी विक्री बाबत कोणतेही स्पष्ट कायदेशीर तरतूद अस्तित्वात नाही त्यामुळे ऑनलाईन औषधी विक्री बंद करावी ही मागणी केली प्रसंगी तालुका अध्यक्ष गोविंद महाजन सचिव प्रवीण सरोदे खजिनदार लक्ष्मण सावळे सहसचिव अजय पाटील उपाध्यक्ष गुणवंत बंगाळे उपाध्यक्ष गोपाळ चौधरी तेजपाल खाचणे श्रीधर भोपरीकर अझर मलिक धीरज भंगाळे जितेंद्र जैन विजय सेठ अग्रवाल विजय पाटील निंबोल दत्तात्रय धांडे खानापूर व असंख्य केमिस्ट बांधव हजर होती प्रसंगी सूत्रसंचालन सचिव प्रवीण सरोदे यांनी केले व आभार प्रदर्शन सहसचिव अजय पाटील यांनी केले

No comments