adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चुंचाळे–कर्जाणी रस्ता सुधारणा कामासाठी ₹११.७५ कोटी निधी मंजूर; ग्रामस्थांकडून आमदार दाम्पत्याचे जाहीर आभार

  चुंचाळे–कर्जाणी रस्ता सुधारणा कामासाठी ₹११.७५ कोटी निधी मंजूर; ग्रामस्थांकडून आमदार दाम्पत्यांचे जाहीर आभार चोपडा प्रतिनिधी  (संपादक :- हे...

 चुंचाळे–कर्जाणी रस्ता सुधारणा कामासाठी ₹११.७५ कोटी निधी मंजूर; ग्रामस्थांकडून आमदार दाम्पत्यांचे जाहीर आभार




चोपडा प्रतिनिधी 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


चुंचाळे ते कर्जाणी या ७.५ किलोमीटर रस्ता सुधारणा कामासाठी ₹११.७५ कोटी एवढा भरघोस निधी मंजूर करण्यात आल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निधीसाठी आमदार चंद्रकांत सोनवणे तसेच माजी आमदार लताताई सोनवणे यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल ग्रामस्थ व शिवसैनिकांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करण्यात आले.

रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर संबंधित कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे.

यावेळी समस्त ग्रामस्थ, शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी आमदार दाम्पत्याचे अभिनंदन करत विकासकामांबाबत समाधान व्यक्त केले.

No comments