लग्नाच्या वाढदिवशीच मिळाला उपसरपंचपदाचा बहुमान; सौ. धनश्री चव्हाण यांची वासुंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड रणजित मस्के सां...
लग्नाच्या वाढदिवशीच मिळाला उपसरपंचपदाचा बहुमान; सौ. धनश्री चव्हाण यांची वासुंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड
रणजित मस्के सांगली प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सांगली जिल्ह्यातील वासुंबे ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठी झालेल्या विशेष सभेत सौ. धनश्री निलेश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशीच हा मानाचा बहुमान मिळाल्याने चव्हाण कुटुंबीयांसह ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वासुंबे ग्रामपंचायतीवर आमदार रोहित दादा पाटील गटाचे निर्विवाद वर्चस्व असून ग्रामपंचायतीत ‘१४-०’ अशी एकहाती सत्ता आहे. गटनेते ज्येष्ठ नेते बाळासाहेब एडके (नाना) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांनी एकमताने सौ. धनश्री चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. विरोधकांचे अस्तित्व नसल्याने निवड प्रक्रिया शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
यावेळी लोकनियुक्त सरपंच जयंत पाटील, ग्रामविकास अधिकारी दीपक भंडारे, गटनेते बाळासाहेब एडके (नाना), संतोष एडके, उमेश एडके, डॉ. विकास मस्के, सतीश एडके, सौ. साळे मॅडम, सौ. शुभांगी एडके, सौ. श्वेता रोकडे, सौ. सारिका चव्हाण, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. मायाताई एडके, सौ. सोनाली एडके आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच ब्रह्मनाथ विकास सोसायटीचे माजी चेअरमन अमरभाऊ पांढरे, सामाजिक कार्यकर्ते विलासभाऊ चव्हाण, निलेश चव्हाण, शितल हक्के, रमेश रोकडे, रमेश एडके, पराग एडके, दिग्विजय एडके, संतोष कोळेकर, विजय मोरे, अनिल चव्हाण, गौरव चव्हाण, ज्ञानदेव एडके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपसरपंचपदी निवड आणि लग्नाचा वाढदिवस असा दुहेरी आनंद एकाच दिवशी लाभल्याने चव्हाण कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. निवडीनंतर उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन सौ. धनश्री चव्हाण व श्री. निलेश चव्हाण यांचा सत्कार केला.
यावेळी नूतन उपसरपंच सौ. धनश्री चव्हाण यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही देत, आमदार रोहित दादा पाटील यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

No comments