यावल येथील जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलचा दहावीचा १००% निकाल; वैष्णवी युवराज भंगाळे प्रथम यावल (प्रतिनिधी): राहुल जयकर (संपादक -:- हेमकांत ...
यावल येथील जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलचा दहावीचा १००% निकाल; वैष्णवी युवराज भंगाळे प्रथम
यावल (प्रतिनिधी): राहुल जयकर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचालित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलने उल्लेखनीय यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षीही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला असून विशेषतः मुलींनी गुणवत्तेत बाजी मारली आहे.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये वैष्णवी युवराज भंगाळे हिने 90.60 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तनुश्री कैलास अहिरे हिने 90 टक्के गुणांसह द्वितीय, तर योगिनी गणेश जावळे हिने 89 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. तसेच निधी पंकज पाटील हिने 87.40 टक्के, तर प्रांजल श्रीकांत पाटील हिने 85.60 टक्के गुण मिळवत विशेष प्रावीण्य संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शरद जीवराम महाजन, मुख्याध्यापिका सौ. रंजना महाजन, दीपाली धांडे मॅडम, शिक्षकवृंद तसेच पालकांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य हे यशामागील महत्त्वाचे घटक असल्याचे मत विद्यालय प्रशासनाने व्यक्त केले.

No comments