न्हावी ते फैजपूर मधल्या रस्त्याच्या दयनीय अवस्था नागरिकात तीव्र संताप डांबरीकरणाची मागणी इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
न्हावी ते फैजपूर मधल्या रस्त्याच्या दयनीय अवस्था नागरिकात तीव्र संताप डांबरीकरणाची मागणी
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
न्हावी-फैजपूर येथील मधला रस्ता खंडोबा मंदिरापासून ते फैजपूर पोलीस स्टेशन पर्यंत सुमारे चार किलोमीटर चा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत गेला असून ठिकठिकाणी गड्डे पडले आहेत. तसेच रस्त्यावरची खडी पूर्णपणे उखडलेली असून रस्त्याच्या साईट पट्टा सुद्धा खोल गेल्यामुळे व रस्त्याच्या काही ठिकाणी काटेरी झुडपे आणि गवत रस्त्यावर वाढल्यामुळे शेती अंतर्गत कामासाठी प्रवास करणे धोकादायक बनले आहे . संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण करावी अशी मागणी होत असून या रस्त्याने शेतीमालासाठी अत्यंत वर्दळीचा असून केळी कापण्यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी तसेच इतर कामासाठी व वाहन धारकांची फैजपूरला ये जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सद्यस्थितीत या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे तसेच खडी पूर्णपणे उखडलेली असून प्रवास करण्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरत आहे. संबंधित विभागाने या रस्त्याकडे तात्काळ लक्ष देऊन रस्त्याचे दुरुस्ती व डांबरीकरण करावे असे मागणी शेतकरी तसेच वाहनधारक यांच्या कडून मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे.
बऱ्याच वर्षापासून या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधींना या रस्त्याचा विसर पडला की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्त्याच्या दुरावस्थामुळे शेतमाल वाहतूक, प्रवास ,आणि दैनंदिन कामासाठी ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वीच रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व वाहनधारक व्यक्त करीत आहे.

No comments