adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तेगबीर सिंह संधू यांनी जालना पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला, तर पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यांची बदली!

 तेगबीर सिंह संधू यांनी जालना पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला, तर पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यांची बदली!   (जालना जिल्हा ) सौ. अनुजा...

 तेगबीर सिंह संधू यांनी जालना पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला, तर पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यांची बदली! 


 (जालना जिल्हा ) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 जालन्याच्या पोलीस प्रशासनात चांगलाच मोठा बदल दिसून आला यामध्ये पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक या दोन्ही अधिकाऱ्यांच्या एकाच वेळी बदल्या झाल्या आहेत. पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यांची राज्य सायबर सुरक्षा विभागात बदली करण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून आयुष नोपाणी यांची चंद्रपूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यांच्या रिक्त जागेवर मालेगांव येथील अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असणारे गेतबीर सिंह संधू यांची जालना पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. तेगबीर सिंह संधू हे 2018 च्या बॅचच्या महाराष्ट्र कॅडेरचे पोलीस अधिकारी आहेत. गेल्या काही वर्षात जालना जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढसाळल्याची भावना नागरिकांमध्ये होती. खून,दरोडे,लुटमार आणि चोऱ्यांच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळाली होती. त्यामुळे आता नव्या पोलीस अधीक्षकांकडूंन कायदा व व्यवस्था सुधारण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. तेगबीर सिंह संधू यांच्यासमोर जिल्ह्यातील वाढते गुन्हेगारी नियंत्रणात आणणे अवैध धंद्यांवर आळा घालणे, आणि नागरिकांचा विश्वास परत मिळवणे ही मोठी आव्हाने असणार आहेत. तर पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यांनी जालना पोलीस अधीक्षक पदभार स्वीकारल्यापासून नेहमीच प्रयत्नशील दिसून आले आहेत.

No comments