चोपडा शहर पोलिसांची कारवाई : १० गुरांची सुटका; दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा शहर पोलीस...
चोपडा शहर पोलिसांची कारवाई : १० गुरांची सुटका; दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत प्राण्यांची अवैधरित्या वाहतूक व छळप्रकरणी दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि.२५ मे २०२६ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास नागलवाडी गावाजवळील गावाच्या नाल्याजवळ असलेल्या महादेव मंदिर परिसरातील रस्त्यावर उघडकीस आली.
याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २२०/२०२६ अन्वये प्राण्यांचे छळास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (१)(G)(J) तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (अ)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्यादी पो.कॉ.मदन रतीलाल पावरा, नेमणूक चोपडा शहर पोलीस स्टेशन यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, दोन अज्ञात इसमांनी १० गुरे कत्तलीच्या उद्देशाने जखडून बांधून ठेवली होती. तसेच त्या गुरांना चारापाणीची कोणतीही व्यवस्था न करता पायी हाकत नेत असताना ती आढळून आली.
पोलिसांनी घटनास्थळावरून अंदाजे ४ लाख २० हजार रुपये किमतीची १० गुरे ताब्यात घेतली. यात गावठी व गिर जातीचे बैल, बेल, गाय व वासरांचा समावेश असून विविध रंग व वयोगटातील जनावरे हस्तगत करण्यात आली आहेत.
सदर गुन्हा तक्रार प्राप्त होताच दि.२५ मे २०२६ रोजी दुपारी ३.२८ वाजता तत्काळ दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका राजेंद्र कोळी हे करित आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे परिसरात जनावरांच्या अवैध वाहतूक व कत्तलप्रकरणी हालचालींवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केल्याचे बोलले जात आहे.
No comments