adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा शहरात सात जनावरांची चोरी; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास भोकऱवाडा परिसरातील गोठ्यातून अज्ञात चोरट्यांचा हातसाफ; चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 चोपडा शहरात सात जनावरांची चोरी; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास भोकऱवाडा परिसरातील गोठ्यातून अज्ञात चोरट्यांचा हातसाफ;  चोपडा शहर पोलीस ठाण्या...

 चोपडा शहरात सात जनावरांची चोरी; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

भोकऱवाडा परिसरातील गोठ्यातून अज्ञात चोरट्यांचा हातसाफ; चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चोपडा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा शहरातील भोकऱवाडा परिसरात अज्ञात चोरट्यांनी गोठ्यातून तब्बल सात जनावरे चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीमध्ये दोन गायी (वासरू) व पाच बैल असा एकूण अंदाजे २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी पारख उर्फ अनिस अलीन मीर(रा. भोकऱवाडा,चोपडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत जनावरांबाबत प्रतिबंधक तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि.२४ मे २०२६ रोजी रात्री १० वाजेपासून ते २५ मे रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.भोकऱवाडा येथील सार्वजनिक शौचालयाजवळील गोठ्यात बांधून ठेवलेली जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे.

चोरीस गेलेल्या जनावरांमध्ये विविध रंगांच्या व जातींच्या गायी व बैलांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत अंदाजे २ लाख ५० हजार रुपये इतकी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ दिपक विसावे हे करीत आहे.

No comments