अल्पवयीन मुलीवर मावसाने केला अत्याचार !नात्याला काळीमा फासणारी घटना. मुबारक तडवी रावेर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्यातील सावद...
अल्पवयीन मुलीवर मावसाने केला अत्याचार !नात्याला काळीमा फासणारी घटना.
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशनचे हद्दीत पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्यानंतर खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे पीडीता ही अल्पवयीन असून ४७ वर्षं वयोगटातील मावसाने एका पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले असल्याची घटना घडली आहे या भयंकर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून या नराधमाच्या विरूध्द संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी संबंधिता विरोधात सावदा पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की रावेर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन १७ वर्षीय मुलीवर नात्याने तिचा काका (मावसा) लागणाऱ्या ४७वर्षांच्या प्रौढाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार १२/११/२०२५ ते २९/५/२०२६ या कालावधीत घडला. या मुलीवर त्या व्यक्तीने दबाव टाकून बळजबरीने शारीरीक संबंध बनविले. मुलीने या संदर्भात सावदा पोलीस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीवरून
सावदा पोलीस स्टेशनमध्ये त्या नराधमाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(२) (एफ); ३५१(२) आणि पोक्सो कायद्यातील कलम ४,६,५, (एन) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक राहूल सानप, हवालदार मेहरबान तडवी आणि पोलीस कॉन्स्टेबल संजय तडवी हे करीत आहेत.

No comments