वर्डी गावातील १० युवकांची अग्निवीरमध्ये निवड; गावात आनंदाचे वातावरण प्रतिनिधी रविंद्र कोळी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) वर्डी गावासाठी अभ...
वर्डी गावातील १० युवकांची अग्निवीरमध्ये निवड; गावात आनंदाचे वातावरण
प्रतिनिधी रविंद्र कोळी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वर्डी गावासाठी अभिमानाची बाब ठरली असून गावातील तब्बल 10 युवकांची भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत यशस्वी निवड झाली आहे. या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि देशसेवेची जिद्द यांच्या जोरावर या युवकांनी हे यश संपादन केले. निवड झालेल्या युवकांचे गावात उत्साहात स्वागत करण्यात आले. ग्रामस्थ, पालक व विविध क्षेत्राती
ल मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वर्डी गावातील युवकांनी मिळविलेल्या या यशामुळे इतर तरुणांनाही सैन्य भरतीची प्रेरणा मिळाली असून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. निवड झालेल्या सर्व अग्निवीरांचे परिसरातून कौतुक होत असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments