मुरुम चोरी उघड करणाऱ्यांवर थेट घातला भरधाव जेसीबी.. जीवे मारण्याचा केला प्रयत्न..एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई..मुख्य आरोपी जेसीबीसह गजाआड...
मुरुम चोरी उघड करणाऱ्यांवर थेट घातला भरधाव जेसीबी.. जीवे मारण्याचा केला प्रयत्न..एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई..मुख्य आरोपी जेसीबीसह गजाआड
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- प्लॉटमधून बेकायदेशीरपणे मुरुम चोरीचा प्रकार उघडकीस आणणाऱ्या आणि चोरांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या फिर्यादी व त्यांच्या मित्राच्या अंगावर थेट भरधाव वेगात जेसीबी घालून त्यांना गंभीर दुखापत करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.याप्रकरणी एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशनने अत्यंत तत्परतेने कारवाई करत आरोपीला जेसीबीसह ताब्यात घेतले आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी विजय दत्तू कानडे (वय ३८ वर्षे,धंदा- नोकरी,राहणार- तपोवन रोड, ता.जि.अहिल्यानगर) यांनी याप्रकरणी रीतसर फिर्याद दिली आहे.दि.२९/०५/२०२६ रोजी रात्री ११:१५ वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या रोडवर,जरे वस्ती जवळ फिर्यादी यांच्या चुलत भावाच्या मालकीच्या प्लॉटमध्ये काही लोक जेसीबीच्या सहाय्याने बेकायदेशीरपणे मुरुम चोरी करत असल्याची माहिती मिळाली.माहिती मिळताच फिर्यादी विजय कानडे आणि त्यांचे मित्र प्रदीप चिंधे हे तातडीने हनुमान मंदिराशेजारी असलेल्या सदर प्लॉटवर गेले. तेथे मुरुम चोरी करत असलेला मुख्य आरोपी राम उर्फ गणेश मधुकर म्हस्के व त्याचा जेसीबी चालक हे दोघे पोलिसांच्या भीतीने जेसीबी व इतर डंपर घेऊन जेऊर गावच्या दिशेने पळून जात होते.फिर्यादी विजय कानडे आणि प्रदीप चिंधे यांनी आपल्या मोटारसायकलवरून (क्र. एम एच १६ बी जे २१२६) आरोपींचा पाठलाग करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.मात्र, आपण पकडले जाऊ या भीतीने आणि कृत्याची पूर्ण जाणीव असतानाही,जेसीबी चालकाने त्याच्या ताब्यातील जेसीबी भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.या भीषण धडकेत विजय कानडे आणि प्रदीप चिंधे हे गंभीर जखमी झाले.आरोपीने त्यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याने त्यांच्या गंभीर दुखापतीस व मरणास कारणीभूत ठरण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३८४/२०२६, बीएनएस कलम १०५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल होताच एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि माणिक व्ही. चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवून सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी राम उर्फ गणेश मधुकर म्हस्के (वय २५ वर्षे, रा. जेऊर बायजाबाई, ता. जि. अहिल्यानगर) याला गुन्ह्यात वापरलेल्या जेसीबीसह ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री.मनोज मोंढे हे करत आहेत.सदरची उल्लेखनीय कामगिरी श्री. मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक,श्री. शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली
सपोनि माणिक व्ही.चौधरी प्रभारी अधिकारी एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशन,पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे,सफौ.राकेश खेडकर,पोहेकॉ.राजू सुद्रिक,पोहेकॉ.आजिनाथ पालवे,पोकॉ.दीपक फुंदे,पोकॉ. नवनाथ दहिफळे,पोकॉ.किशोर जाधव,पोकॉ.जयसिंग शिंदे,पोकॉ.तांदळे यांनी केली आहे.

No comments