adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

असमाधानकारक कामकाजामुळे दोन ग्रामीण गृहनिर्माण अभियंते कार्यमुक्त

 असमाधानकारक कामकाजामुळे दोन ग्रामीण गृहनिर्माण अभियंते कार्यमुक्त जळगाव प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  पंचायत समिती जळगाव अंतर्गत...

 असमाधानकारक कामकाजामुळे दोन ग्रामीण गृहनिर्माण अभियंते कार्यमुक्त

जळगाव प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 पंचायत समिती जळगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या दोन ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना असमाधानकारक कामकाज व वारंवार सूचना देऊनही सुधारणा न झाल्याने कार्यमुक्त करण्यात आल्याचे आदेश गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी काढले आहेत.

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव यांच्या पत्रानुसार योगेश जनार्दन सपकाळे व योगेश राजेंद्र पाटील हे दोन्ही ग्रामीण गृहनिर्माण अभियंते पंचायत समिती जळगाव अंतर्गत कार्यरत होते. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये घरकुलांची कामे वेळेत पूर्ण न होणे, कामकाजात निष्काळजीपणा आढळणे तसेच वारंवार सूचना देऊनही अपेक्षित सुधारणा न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी दुपारनंतर दोन्ही अभियंत्यांना त्यांच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडे असलेल्या ग्रामपंचायती व कामांचा अतिरिक्त कार्यभार इतर ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांकडे सोपविण्यात आला आहे.

यानुसार योगेश सपकाळे यांच्याकडील कार्यभार मनोज राजेंद्र बोरसे यांच्याकडे, तर योगेश पाटील यांच्याकडील कार्यभार धनंजय संतोष वाणी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यभार हस्तांतरित करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही आदेशात देण्यात आले आहेत.

सदर आदेशाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव तसेच प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव यांना माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.

No comments